नांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

टीम महाराष्ट्र देशा : पावसाने मारलेल्या धडीला पूर्ण विराम मिळाला आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणि त्यामुळे पारोळा तलाव भरला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने पारोळा, भांडेगाव, साटंबा, जामठी, सावा, नवलगव्हाण या सहा गावांचा संपर्क तुटलाय. २ दिवसांपासून सहा गावचे नागरिक आणि प्राणी वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.

ओढ्यावरच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ६५ मीमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत साधारण ६३% इतका पाऊस झाल्याचे नोंदवले आहे. नांदेडमधील आठ तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, किनवट येथील पूरस्थिती निवळली असून,जनजीवनदेखील पूर्ववत झाले आले. दोन दिवसांच्या पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण १०० टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन दरवाज्यांमधून प्रती सेकंद ७९८ क्युमेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरु आहे. पाऊस वाढला किंवा पाण्याची पातळी वाढली तर धरणाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५७६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल