अशोक चव्हाण हे नांदेडचे शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री

मुंबई : लोकसभा निवडणूकीपासून ते अत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींत भाजपे वारू सुसाट सुटले होते पण भाजपच्या या विजयी वारूला नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी लगाम लावली आणि भाजपचा चांगलाच तिळपापड झाल्याच आपण सगळ्यांची पाहिलं. भाजपच्या या पराभवाचा जितका आनंद कॉंग्रेस झाला त्याहून अधिक शिवसेनेला झाल्याच पाहायला मिळाल. शिवसेनेने भाजपच्या या पराभवावर चांगलच तोंडसुख घेतलं पण अद्याप यावर भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती पण अखेर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चांगलाच प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई मध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेला दोन पक्षप्रमुख आहेत, एक राज्याचे प्रमुख आणि दुसरे नांदेडमधील शिवसेनेचे प्रमुख अशोक चव्हाण आहेत.

bagdure

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना ही काँग्रेसची ‘ब टीम’ असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर नांदेडमध्ये भाजप नव्हे, शिवसेनाच भुईसपाट झाली, असे प्रत्युत्तर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, नांदेड महापालिका निकालाचे नीट विश्लेषण करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील शिवसेनेला दिला.

You might also like
Comments
Loading...