नानांचा अंदाज थोडक्यात चुकला;गुजरातमध्ये भाजपचा निसटता विजय

संजय काकडे यांनी वर्तवलेला अंदाज बनला होता अतिशय चर्चेचा विषय

पुणे – गुजरातमध्ये भाजपच जिंकणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलवाल्यांनी वर्तवला होता तरी भाजपचेच खासदार संजय काकडे यांनी मात्र, गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं . विशेष म्हणजे पुणे महापालिकामध्ये संजय काकडे यांनी वर्तवलेलं भाकित शंभर टक्के खरं ठरलं होतं.काकडे यांचा अंदाज तंतोतंत जुळतोय कि काय अशी परिस्थिती मतमोजणी सुरु असताना झाली होती मात्र अखेर विजयाची माळ भाजपच्या गळ्यात पडली आहे .

संजय काकडे यांनी वर्तवलेल्या अंदाजाकडे सर्वांचच लक्ष लागलेलं होतं. भाजपने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निसटता विजय मिळवला असला तरी संजय काकडे यांनी वर्तवलेला अंदाज अतिशय चर्चेचा विषय बनला होता.मतमोजणीचे कल भाजपच्या बाजूने येत असून १०० हून अधिक जागांवर भाजप आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ७० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.