नारायण राणे धावले भाजपच्या मदतीला !

narayan rane and cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : सध्या गाजत असलेल्या नाणार प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी आंदोलनाच हत्यार उपसलं होत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं नाणारवासियांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. योग्यवेळी प्रकल्पाबाबत निर्णय जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं.

नाणार प्रकल्पामुळे त्या परिसरातील आंबा, काजू आणि नारळ पिकाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचा दावा परिसरातील ग्रामस्थांचा आहे. त्याचप्रमाणे देवगड हापूस व्यापारालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पेट्रोकेमिकल प्रकल्पाला 14 गावांतील ग्रामस्थांचा विरोध आहे.

दरम्यान, नाणार प्रकल्पासाठी १४  हजार एकरात एक भाग आणि विजयदुर्ग परिसरात एक हजार एकरात दुसरा भाग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ४ ठिकाणी जिल्हा प्रशासन जमीन संपादीत करणार आहे.