कोणी कितीही प्रयत्न केला तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेने भाजप समोर युती करण्यासाठी ठेवलेल्या अटींपैकी महत्वाची अट म्हणजे ‘नाणार रद्द करावा’ आता भाजप-शिवसेनेची युती झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. नाणार प्रकल्प रद्द करत असल्याची अधिसुचना काढण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता.

त्यानंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी येथे बोलताना म्हणाले की, नाणारमुळे निसर्गाची हानी होते आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. कोकणाने हाक मारल्यास मी कायम येत राहील.

तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार असल्याची घोषणा देखील, सुभाष देसाई यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 हजार हेक्टर तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 300 हेक्टर जमिनींच्या अधिग्रहणाची अधिसूचना काढली होती. पण, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केल्या जाणार आहेत.