नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात कोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही- सुभाष देसाई

मुंबई: नाणार रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. यासंदर्भात बोलतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, राजापूर तालुक्यातील नाणारसह २५ गावांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय हा प्रकल्प जनतेवर लादला जाणार नाही. कोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असे सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

देसाई पुढे म्हणाले, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे इथे होणारे भूसंपादन थांबविण्यात आले आहे. स्थानिकांच्या संमतीनेच हे संपादन करण्यात येईल. सर्व बाबी तपासून या प्रकल्पाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. या उपरोक्त विषयाशी संबधित लक्षवेधी आमदार श्रीमती हुस्नबानो खलिफे, भाई जगताप आदींनी उपस्थित केली होती.

You might also like
Comments
Loading...