नाणार प्रकल्प विदर्भात आणा : भाजपा आमदार

टीम महाराष्ट्र देशा- कोकणातील नाणार प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये वाद सुरु असताना नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे. सोमवारी नाणारमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले आशिष देशमुख ?

कोकणात हा प्रकल्प झाला नाही तर तो गुजरातमध्ये जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा.विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा,या संदर्भात दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, तसेच यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांची लवकरच भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे असे देशमुख म्हणाले.

You might also like
Comments
Loading...