नाणार प्रकल्प : सेनेची दुटप्पी भूमिका ? मंत्रिमंडळ बैठक खेळीमेळीत

टीम महाराष्ट्र देशा- नाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपमध्ये सुरू झालेले रणकंदन आणि सोमवारी नाणार येथे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली भाषणे पाहता मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री राडा करतील, असे वाटत असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले! मंत्रिमंडळ बैठकीत मात्र बाहेरच्या संघर्षाचा मागमूसदेखील नव्हता. उलट इमूपालनाच्या विषयावर मंत्र्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपमध्ये सुरू झालेले रणकंदन आणि सोमवारी नाणार येथे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली भाषणे पाहता मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री राडा करतील, असे वाटत असताना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र बाहेरच्या संघर्षाचा मागमूसदेखील असल्याचं चित्र पहायला मिळाले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. मात्र पाच मिनिटे अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक थांबवून मुख्यमंत्री आपल्या दालनातील ‘अ‍ॅण्टी चेंबर’मध्ये गेले. काही तरी महत्त्वाचे काम असावे असे मंत्र्यांना वाटले. मात्र काही वेळाने मुख्यमंत्री हसत हसत बाहेर आले ते सेना मंत्र्यांना सोबत घेऊनच. सेना मंत्र्यांचे चेहरेही काही घडलेच नाही असे दिसत होते. त्यानंतर संपूर्ण बैठकीत सेनेच्या एकाही मंत्र्याने नाणारचा उल्लेख केला नाही आणि मंत्रिमंडळाची बैठक नेहमीप्रमाणे खेळीमेळीत पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

You might also like
Comments
Loading...