Share

Nana Patole | “रात्रभर दोन शाहीर भांंडून लोकांचं मनोरंजन करतात तसं…”, नाना पटोलेंची झणझणीत टीका

मुंबई : काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. राज्याच्या इतिहासात काल पहिल्यांदा शिवसेना (Shivsena) पक्षाचे दोन दसरा मेळावे झाले. दसरा मेळावा पार पडला तरी आजही याची चर्चा कमी झालेली नाही. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अप्रत्यक्षपणे दसरा मेळाव्याची खिल्ली उडवत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी दसरा मेळाव्याची उडवली खिल्ली :

दोन शाहीर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन कसं करतात त्याच प्रकारे कालचे दसरा मेळावे झाले. एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात मोदी – शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. काँग्रेसवर आरोप तोही महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनीही करणे हे हस्यास्पद आहे, असं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं आहे.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये प्रामाणिक प्रयत्न करत आहेत असं म्हणत पटोले यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली. देशाच्या – राज्याच्या समोर अनेक प्रश्न असून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. या विषयावर सरकार का बोलत नाही, असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला आहे.

आपल्याकडे तमाशा पद्धत आहे, तीच काल झाली असून लोकही त्यांची गंमत बघण्यासाठी जातात, तो विचार ऐकण्यासाठी जात नाहीत, तसे या महाराष्ट्रात एक प्रकारे मनोरंजनचा कार्यक्रम या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सुरू झाला असावा, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण :

दरम्यान, भारत जोडो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असल्याचं म्हणत हे सरकार जाणार आहे, असा टोला देखील पटोले यांनी लगावला आहे. त्यामुळे किती कोणाला पद वाटायचे तितके वाटून घ्या, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. राज्याच्या इतिहासात काल …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now