मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता महाविकासाआघाडीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकार कोसळण्याच्या दिशेने सध्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊतांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण केली असल्याचा भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यानंतर नितीन देशमुख यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे, नितीन देशमुख यांच्या स्पष्टीकरणावरून नाना पटोले यांनी प्रतीक्रीया दिली आहे.
“नितीन देशमुख यांच्या स्पष्टीकरणावरून समजू शकतं कि, किती खालच्या थराला जाऊन लोकशाहीचा खून होत आहे. सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. या संघर्षात काँग्रेस हि शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभी आहे!”,असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.
नितीन देशमुख यांच्या स्पष्टीकरणावरून समजू शकतं कि किती खालच्या थराला जाऊन लोकशाहीचा खून होत आहे..
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं ..
या संघर्षात काँग्रेस हि शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभी आहे ! #Maharashtra
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 22, 2022
नितीन देशमुख काय म्हणाले?
नितीन देशमुख म्हणाले, “माझी तबीयत चांगली आहे. मी रात्री ३ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर मी उभा होतो. मात्र १०० ते २०० पोलीस माझ्या मागे होते. ते मला कोणत्याच गाडीत बसू देत नव्हते. त्यांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले. अटॅक आला म्हणून माझ्यावर उपचार करायचे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता. माझा बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा होता. २०, २५ लोकांनी जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन दिले. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र त्या लोकांच होत. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असून उद्धव साहेबांसोबतच आहे.”
महत्वाच्या बातम्या –