‘नाना पटोलेंचा देखील फोन टॅप झाला होता’ ; थोरातांचे गंभीर आरोप

balasaheb thorat

मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याची माहिती आहे. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा ‘द वायर’सह इतर काही मीडिया संस्थांनी केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे.

दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फोन टॅपिग प्रकरणी मोठा आरोप केला आहे. ‘ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही फोन २०१७-१८ मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP