‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’

‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’

Nana Patole

नागपूर: सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहे. सर्व पक्ष निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त आहेत तर काही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिशन विदर्भा देखील सुरू केले आहे. त्याच सोबत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विदर्भा दौरा करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

कॉंग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दुकान बंद करण्याची भाषा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुकान बंद पाडण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंचे साकोलीचे दुकान बंद पाडू, असा घणाघाती प्रहारही कुंटे पाटलांनी केला.

नाना पटोलेंना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले, पण मोठा कालावधी उलटूनही मंत्रिपद मिळालेले नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यताही दिसत नाहीये. हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर ते राग काढू शकत नाहीत. त्यामुळे ते असे असंतुलित विधाने करीत सुटले आहेत, या निष्कर्षावर आम्ही येऊन पोहोचलो आहोत, अशी टीका प्रवीण कुंटे पाटील यांनी केली आहे. नाना पटोलेंना राजकीय निराशा आली आहे, हे त्यांच्या विधानांवरून नेहमी जाणवते, असा टोला देखील कुंटे पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: