fbpx

सरकार करतंय अण्णांचा अपमान ; अण्णांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं – नाना पटोले

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपालसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सहाव्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. मात्र, ”अण्णांच्या सर्व मागण्या या केंद्राच्या अखत्यारितील आहेत. मात्र त्यांचा अपमान करण्यासाठी राज्यातला मंत्री पाठवण्यात आला आहे,” अशी टीका भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेस मध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी केली.

”एवढ्या वयाचा माणूस, जो आज देशासाठी लढतोय, त्याचा अपमान ही जनता कधीही सहन करु शकत नाही. अण्णांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले,” असं नाना पटोले म्हणाले.

अण्णांशी चर्चा करण्याची जबाबदारी अगोदरपासूनच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आलेली आहे. अण्णांचं आंदोलन सुरु झाल्यापासून गिरीश महाजन दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र गिरीश महाजनांच्या शिष्टाईला अद्याप तरी अपयश आलेलं आहे.

1 Comment

Click here to post a comment