‘नागपूर विधानपरिषदेत बिनविरोधसाठीची प्रस्ताव आला असता तर..!’

‘नागपूर विधानपरिषदेत बिनविरोधसाठीची प्रस्ताव आला असता तर..!’

Nana Patole

नागपूर : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातल्या एकूण ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. आज दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे.

कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. पण नागपूरमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट सामना रंगणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी दिली गेल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.

कोल्हापूर आणि नंदुरबार-धुळे या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. नंदुरबार-धुळे भाजपला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला आली आहे. मुंबईत एक शिवसेना आणि एक भाजप अशा बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. पण नागपूरमध्ये लढत होईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

अर्ज परत घेण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयरच विजयी होतील. नागपूरसाठीचा कोणताही प्रस्ताव भाजपकडून आला नाही. त्यामुळे नागपूरचा निर्णय झालेला नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: