भाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेसच्या संपर्कात – नाना पाटोले

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. सध्याच्या घडीला कांग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते, आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. अशात आता महाराष्ट्र कांग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट, राज्यमंत्री, नेते कांग्रेसच्या संपर्कात असल्याने लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा गोप्य स्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली असता त्यांनी आज गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली असून ते यावेळी बोलत होते. गोंदिया जिल्ह्यात आतपर्यंत फक्त 5% शेतकऱ्याचे शेतीचे कामे झाली असून पाण्याअभावी 95 % शेतकऱ्यांची पेरणी न झाल्याने गोंदिया भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. गोंदिया भंडारा जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित झाला नाही तर लवकरच काँग्रेस मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली आहे.