नाना पटोलेंचं मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य; मी दिल्लीत गेलो होतो, पण…

नाना पटोलेंचं मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य; मी दिल्लीत गेलो होतो, पण…

Nana Patole

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या काही मंत्र्यांच्या खात्यात आदलाबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींना आता वेग आला आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याने राज्यातील काँग्रेस बदल घडवण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारी दिल्लीला गेले होते त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता नाना पटोलेंनी मौन सोडले आहे.

राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्याने मंत्रिमंडळ तयार केले, त्याच पद्धतीने काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने घेतले जातील. हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे बदल करावेत, असा काँग्रेसने आग्रह धरला असल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्यावरून चर्चा सुरू आहे. त्याच वेळी विधानसभेचे अध्यक्षपद भरण्यासाठीची चर्चा देखील पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर काहींना मंत्रिपद, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देतानाच मंत्रिपदही दिले जाईल, असा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता आहे. त्यासाठी त्यांचाही आग्रह आहे.

महत्वाच्या बातम्या: