थेट मोदींचे जात प्रमाणपत्रच तपासणार नाना पटोले

नागपूर : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे.मोदींच्या ओबीसी असण्याबाबतच शंका उपस्थित करताना मोदी खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.

काय म्हणाले नाना पटोले ?

”भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने, मी पापाच्या व्यवस्थेपासून मोकळा झालो आहे. मी आता त्यांच्या पापाचे भांडे फोडणार आहे, मोदींनी गुजरात निवडणुकीत मागास जातीचा मुद्दा पुढे केल्यानेच मी राजीमाम्यासाठीही जाणिवपूर्वक कालचा दिवस निवडलाय. मी अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही पण ११ तारखेला राहुल गांधींसोबत गुजरातच्या प्रचारसभेत नक्कीच सहभागी होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्या सोबत वाद घातला होता, त्यामुळे ते खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, पंतप्रधानांच्या दबावामुळेच वेगळ्या विदर्भाचे बील संसदेत येऊ शकले नाही तसेच दानवे आपली खूर्ची वाचवण्यासाठी माझ्या राजीनाम्यावर बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.