मुंबई: ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील वीज बिलाबाबत काही खुलासे केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून वीजबिलाची थकबाकी व अनुदान मिळत नसल्याची तक्रार देखील केली आहे. वीजबिल थकबाकीमुळे वीजखरेदीत अडचण येऊन राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाल्यास काँग्रेसवर आरोप होऊ शकतात, असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले.
नितीन राऊत म्हणाले होते, ग्रामविकास, नगरविकास विभाग थकबाकी देत नाही तर वित्त विभाग अनुदान देत नाही. ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे. वीजबिल थकबाकीमुळे वीजखरेदीत अडचण येऊन राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाल्यास काँग्रेसवर (Congress) आरोप होऊ शकतात. मात्र, महाविकास आघाडी म्हणून सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देणार असल्याचे सांगितले असून राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे नितीन राऊत म्हणाले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना याबाबत विचारले असता, पटोले म्हणाले, वीजबिल थकबाकीचे संकट भाजपच्या राजवटीत निर्माण झाले. हे भाजपचे पाप आहे. ऊर्जामंत्र्यांनी केलेले विधान बरोबर नाही, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर लक्ष घातले पाहिजे. महाविकास आघाडीत सगळं ठीक आहे. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याची बाजू मांडतो, असेही पटोले यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या:
“संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणाला, ‘जय श्री राम’
तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर