छगन भुजबळ यांनाच फक्त आत टाकले, बाकीच्यांना का नाही?- नाना पटोले

नाना पटोले यांची पुण्यात चौफेर टोलेबाजी

पुणे- सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना आत टाकू असे वाटले होते.पण  छगन भुजबळ यांनाच फक्त आत टाकले. बाकीच्यांना का नाही. याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी करून ‘भुजबळ एकटेच आहेत का?’ असा सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला ते वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात पटोले बोलत होते.

लोकप्रतिनिधी असल्याने मी जनतेच्या समस्या, अडचणींना वाचा फोडतो. आपल्या देशातील परिस्थिती बिकट आहे. जो आवाज उठवतो, त्याला मारले जात आहे. बेरोजगारी, नियोजनशून्य कारभार यातून समस्या वाढत आहेत. अवैध संपत्तीचा आरोप असलेले छगन भुजबळ हे एकमेव आहेत का? केवळ महात्मा फुलेंचे वंशज म्हणून त्यांना वेगळा न्याय लावला जात असेल, तर त्यावर आवाज उठवलाच पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

 

You might also like
Comments
Loading...