Nana Patole । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर पुढं काय होऊ शकतं, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वात आधी काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये जातील असं विधान केलं.
खैरे यांच्या या वक्तव्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील हाच मुद्दा पकडत “शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत”, अशी टीका केली. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर भाजपाची बी टीम आहेत. ते भाजपाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत, असे नाना पटोले म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, आपल्या राज्यात एक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर भाजपाचे प्रवक्ते झाले आहेत, असे त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं. ते भाजपासाठी काम करत आहेत. काँग्रेसमधून कोणीही सोडून जाणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्रात ईडीचं भाजपाप्रणित सरकार असल्याचा टोला त्यांनी लगावला. महिलांचा सन्मान न ठेवणे हा भाजपाचा धर्म आहे, अशी टीका देखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोलेंच्या या दाव्यावर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडून काय उत्तर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar । “…तर नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार”; प्रकाश आंबेडकरांचा टोला
- T20 World Cup | नेदरलँड्सने जाता जाता दिले गिफ्ट, ‘या’ सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
- IND vs ZIM ICC T20 | झिम्बाब्वेचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा प्रयत्न
- Devendra Fadanvis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यामागे नक्की कोणाचा हात?, देवेंद्र फडणवीसांना केला खुलासा
- Alia Bhatt | रणबीर-आलियाच्या घरी लवकरच येणार आहे छोटा पाहुणा