Nana Patole | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून शिंदे-भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
“२०१४ ते २०१९ दरम्यान भाजपा सरकारने विदर्भासाठी काय केलं? याबाबत सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामावर चर्चा करण्याचा प्रस्ताव शिंदे सरकार मांडण्याच्या तयारीत आहे. मात्र, आज आम्ही त्यांचे पितळ उघडं करू”, असा इशाराच त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
खोटारडेपणा आणि चेष्टा, हा भाजपाचा खरा चेहरा असल्याचं नाना पटोले म्हणालेत. नरेंद्र मोदींनी करोना काळात लावलेले निर्बंध आणि जनतेचे झालेले हाल भाजपा विरसली आहे. त्यांच्यासारखी वाईट मानसिकता असलेली लोकं या देशात बघायला मिळणार नाही”, असा घणाघात नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, “आज कर्नाटक सरकारदेखील महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, असा ठराव त्यांच्या विधानसभेत मांडणार आहे. मात्र, जे आमचं आहे, ते आम्ही घेऊच.” त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | तुम्ही ग्रामपंचायतीत उभे रहा मग बघू हवा कशी निघते ; नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
- Sanjay Raut | “सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय का?”; सीमाप्रश्नावरून राऊतांचा संतप्त सवाल
- MPSC Recruitment | खुशखबर! एमपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Kapil Dev | कपिल देव यांनी खेळाडूंवर केली वादग्रस्त टीपणी, म्हणाले…
- Coronavirus | जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा कहर, तर भारतात ‘ही’ स्थिती