मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते शिंदे-फडणवीस सरकारवर सतत खार खाऊन असतात. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्ला केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन 100 दिवस झाले आहेत. या 100 दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकावर सडकून टीका केली आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नाहीत. थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आमच्या सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर 50 टक्के कमी करावे, अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत.सीएनजी पीएनजीवरचे कर आमच्या सरकारने कमी केले पण या सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत. उलट सीएनजी 84 रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, राज्यात होत असलेली तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व 1 लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ‘ईडी’ सरकारने 100 दिवसांत केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maruti Car Update | 10 लाखांपेक्षा कमी किंमती असलेल्या ‘या’ आहेत मारुतीच्या लोकप्रिय कार
- Ajit Pawar | बारामतीमध्ये राष्ट्रवादीला हारवण्याची भाषा करणाऱ्या भाजपला अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- CM Eknath Shinde | नाशिक येथील भीषण अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Nashik Accident | झोपेत असलेल्या प्रवाश्यांवर काळाचा घाला! नाशिक येथे पहाटे बस आणि टँकरचा भीषण अपघात
- Ajit Pawar | “मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता, पण उद्धव ठाकरेंच्या मिळत होता”
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले