भाजपने खुर्चीसाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप केले – नाना पटोले

NANA PATOLE DEVENDRA FADNAVIS

बुलढाणा : राज्यातील भाजपाने आपल्या खुर्ची साठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचं ‘पाप’ ठरवून केल आहे, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत दरम्यान बोलत होते.

देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजपा पदाधिकारी कधी मराठा आरक्षण, कधी एससी-एसटी तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून राज्य सरकार अस्थिर असून सरकार आज पडणार उद्या पडणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत, आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचा पाप भाजपने ठरवून केलं असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

तर, चार राज्यातील निवडणुका असल्याकारणाने या निवडणुका घेण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये देश कोरोणा मुक्त झाल्याचे सांगितले आणि मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. देशामध्ये त्या वेळीच तात्काळ उपाययोजना केल्या असत्या तर देशामध्ये कोरोणाचा एवढा हाहाकार माजला नसता. मात्र, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नसून ते प्रचारजीवी आहेत आणि त्यांना कोरोणाच्या परिस्थिती प्रचार करता आला नसता त्यामुळे देशातील जनतेला अंधारात ठेवून कोरोणामुळे देशातील कोट्यावधी निष्पाप जनतेचा बळी या केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेला असल्याचा आरोप देखील यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP