Share

Nana Patole | “खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, त्यामुळे माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही”

Nana Patole | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.  शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी माफी मागावी असे कडू म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राणा आणि कडू यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (Nana Patole)

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादानंतर रवी राणा यांनी माफी मागितली तरी वस्तुस्थिती बदलणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी शिंदे सरकारला सरकारवरला टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी 50 खोके घेतलेत, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते.

तसेच, गुजरातमधील राजकोटमधील मोरबी (Morbi) भागात पूल कोसळल्याची घटना घडली आहे. त्यावरही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. गुजरातमध्ये पूल पडला त्यात,400 लोकांचा मृत्यू झालाय, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होतं. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nana Patole | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now