मी मागासवर्गीय असल्याने मुख्यमंत्री माझी लायकी काढू शकतात – नाना पटोले

टीम महाराष्ट्र देशा: ‘मी मागासवर्गीय आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी लायकी काढण्याचा हक्क असल्याचं म्हणत बंडखोर भाजप नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आपला राजीनामा स्वीकारला जावा यासाठी पटोले यांनी आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी माझी लायकी काढण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय काम सांगावे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान नाना पटोले यांचा राजीनामा आज लोकसभा अध्यक्षांकडून मंजूर करण्यात आला आहे.

भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार असणारे नाना पटोले हे शेतकरी प्रश्नावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्रयांवर नाराज होते. यातूनच पुढे आता त्यांनी भाजप खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर आता ते यवतमाळ मधून भाजप सरकार विरोधात पश्चाताप यात्रा काढणार आहेत.