Share

Nana Patole | “ज्यांना आपला पक्ष सांभाळता…”; चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते सतत एकमेकांवर टीका, टिपण्णी करत असतात. मात्र सध्या महाविकास आघाडीमधील दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं दिसून येतं आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावरून काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (Nana Patole)

ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, अस म्हणत नाना पटोले यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पहिल्यांदाच काँग्रेस आणि ठाकरे गटात अशा पद्धतीचं वाद झाल्यानं महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांनी खैरे यांनी आपलं विधान मागे घेण्याची मागणीही केली आहे.

माझ्या मित्राचाच करेक्ट कार्यक्रम झालाय. खरं तर माझा मित्र मुख्यमंत्री असायला पाहिजे होता, परंतु त्यांचे डिमोशन झाले. त्याचे सर्वात जास्त दुःख मला आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेचा उलटा परिणाम पाहायला मिळत आहे, असंही पटोलेंनी म्हटलं आहे

.दरम्यान, शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची देवेंद्र फडणवीस यांना भीती आहे. त्यामुळे सरकार टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार करून ठेवले आहेत, असं विधान चंद्रकांत खैरे यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या :

Nana Patole | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते सतत एकमेकांवर टीका, …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now