प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार – नाना पटोले

nana patole - prakash aambedkar

अकोला : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीवर भाष्य करताना हे सरकार चालेल की नाही असं अनेक जण म्हणतात. परंतु महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल आणि आगामी २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळून घेण्याचे संकेत दिले आहे. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नाना पटोलेंनी केलं आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांच्या ‘ऐकी’च्या नाऱ्यालाच सुरुंग लावला आहे. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे. ते अकोल्यात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

IMP