भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील प्रतिक्रिया दिली.
भाजपने एसटी संपाला फूस लावल्यामुळे प्रवाश्यांबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागले, असे ते यावेळी म्हणाले.