संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका आम्हीही सांगतोय – नाना पटोले

sanjay rathod and nana patole

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले आहेत. पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी मागील काही दिवसांमध्ये त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करून त्यांनी ते फेटाळले असून चौकशीमधून सत्य समोर येईल असं देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

संजय राठोड यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. तसेच, त्यांनी आरोपांवर अधिक खुलासा न केल्याने भाजपने अधिकच संशय व्यक्त केला आहे. तर, सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने संजय राठोड यांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत भाष्य केलं आहे. संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली आहे. तीच भूमिका आम्ही सांगत आहोत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस तपास करत आहे. तो तपास योग्य पद्धतीने होईल. यासाठी मीडिया ट्रायलची गरज नाही,’ असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राठोड ?

‘पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी नेमली आहे. यातून सत्य बाहेर येईल’ असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या