Share

Nana Patole | “एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले”, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole | मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. काही महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड करुत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरुन पायउतार केल होतं. याचपार्श्वभूमीवर नाना पटोलोंनी टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

तसेच, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि एकीकडं भाजपनं त्यांना अपमानित करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्षाची तर आहेच पण महाराष्ट्राची आहे, ही स्पष्ट भूमिका मी मांडतो असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Nana Patole | मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now