आपण फेरीवाल्यांच्या भाकरी हिरावून घेऊ शकत नाही – नाना पाटेकर

टीम महाराष्ट्र देशा : सध्या मुंबई पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आपला मोर्चा आक्रमकतेने वळवला आहे. मनसेच्या या खळ्ळखट्याक मुळे संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात चांगलाच युद्ध रंगलं असताना आता या वादात अभिनेते नाना पाटेकर उडी घेतली आहे.

नाना म्हणाले, “मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही.

यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले नाही”.

मुंबईतल्या प्रसिद्ध व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी नाना बोलत होते.Loading…
Loading...