कोल्हापुरला नाना पाटेकर यांनी दिली भेट, ‘नाम’च्या वतीने पूरग्रस्तांना 500 घर बांधून देणार

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हपुर – सांगली जिल्ह्यावर आलेली जलआपत्ती ही टळली आहे. मात्र या आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावगावच्या गाव उधवस्त झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. प्रशासन सर्वोतपरी पूरग्रस्तांना मदत करत आहेतचं तर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. नाना पाटेकर आज कोल्हापुरातील 5 गावांना भेट देत असून तेथे मदतकार्य करत आहे.

यावेळी नाना पाटेकर यांनी आपत्तीग्रस्तांना धीर दिला. तर नाम या सामाजिक संस्थेच्या वतीने शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना काळजी करू नका, रडायचं नाही, सगळं ठीक होईल, असे म्हणाले. तसेच, केवळ मी एकटाच नाही, सगळेजण मदत करत आहेत. मी, मकरंद्या किंवा कुणीही एकटा हे मदतकार्य करत नाही. सर्वजण मदत करत आहेत, लोकं मदत देतात. एवढी मोठी आपत्ती आलीय, तात्काळ याच निवारण शक्य होणार नाही, असे देखील नाना म्हणाले.

Loading...

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक