मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपट गृहांवर सरकार कारवाई का करत नाही?-नाना पाटेकर

नाना पाटेकर

टीम महाराष्ट्र देशा: टायगर जिंदा है व मराठी चित्रपट देवा हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यावरून सुरु असलेला वाद आता विकोपाला गेला आहे. यात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील उडी घेतली आहे. मराठी चित्रपटाना डावलणाऱ्या चित्रपटगृहांवर सरकार कारवाई का करत नाही..? असा थेट सवाल नाना पाटेकर यांनी केला आहे. त्यासंदर्भात नानांनी ट्वीट करत आपलं मत व्यक्त आहे.

 राज्य सरकारने मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मल्टिप्लेक्सना नियम आखून दिले आहेत. मग चित्रपटगृहांचे मालक या नियमांचे पालन का करत नाहीत? सरकारही त्यांच्यावर योग्य ती कारवाई का करत नाही?, असे सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता सरकार याविषयी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.