नामांतरासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता-आ.दानवे

ambadas danve

औरंगाबाद – सुपर संभाजीनगर संकल्पनेतून शहराचा विकास करण्यात येत असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुपर संभाजीनगरचा बोर्ड झळकल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी औरंगजेब या नावाचं समर्थन करण्याचं कारण नसून सुपर संभाजीनगर या संकल्पनेतून शहराचा वेगाने विकास करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर 2001 पासून दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांसंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लव औरंगाबाद नामफलकाचे लोकार्पण झालं होतं. त्यावर स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. त्याला उत्तर देतांना आपण औरंगाबादला विरोध केला नसून शहराचं नाव संभाजीनगर करावे अशी आपली आधीपासूनची मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या