“पुण्याचे नाव संभाजीनगर करा, अन्यथा…”, आंबेडकरांचा इशारा

औरंगाबाद : पुणे शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे. त्यासाठी लवकरच पुण्यात मोठे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्ताने औरंगाबादेत आले असता ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

पुणे जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करा, तसेच शनिवारवाड्याचे नाव माँसाहेब जिजाई असे नामकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाचा मुद्दा चांगलाच रंगताना दिसत आहे.

पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले, औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आली की नामांतराचा वाद होतो. निवडणुकीसाठी यावर भावनिक राजकारण खेळले जात आहे, वातावरण दुषित केले जात आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे. त्यांचा अंत्यविधी पुण्यात झाला आहे. अत्यंत क्रुरुपणे त्यांची हत्या करण्यात आल्याने तसे पुणे हे नाव बदनाम झाले असून या शहराला संभाजीनगर यांचेच नाव दिले पाहिजे. त्यासाठी लवकरच पुण्यात मोठे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेना औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवणार असून याबाबत लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या