भाजपकडून राज्यसभेसाठी ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ; जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती

टीम महाराष्ट्र देशा : भाजपने रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं निश्चित झालंय.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीत रामदास आठवलेंच्या आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्ताब झाल्याचं सांगण्यात येतंय.

देवेंद्र फडणवीस यांनी आज अमित शहांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तिथे नेत्यांमध्ये बैठक झाली. उदयनराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते सुधीर मुनगंटीवार आणि धनंजय महाडीक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. तसंच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांवरील चर्चा करण्यात आली. या चर्चेत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे.

बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडीक हेही या बैठकीला उपस्थित राहिले असल्याची माहिती आहे. सदर बैठक गृहमंत्री अमित शाहांच्या दिल्लीतील घरी बैठक सुरू असून या बैठकीत महाराष्ट्रातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील या बैठकीत चर्चा झाली आहे.