फिरोज शहा कोटला मैदानाला आजपासून अरुण जेटलींचे नाव

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानाचे आज पुन्हा नामाकरण होत आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येत आहे. तर फिरोजशहा कोटला स्टेडीयमच्या एका स्टँडला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात येत आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडीयमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये हा नामकरण विधी होणार आहे.

याबाबत डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले की, जेटलीजींच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही हा शानदार कार्यक्रम करत आहे. क्रिकेटशी कोणत्याही प्रकारे जोडलेला व्यक्ती जाणतो की त्यांच्या योगदानाने दिल्ली क्रिकेटला आणि दिल्लीच्या क्रिकेटपटूंना मदत झाली आहे. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि दिल्लीसाठी खेळताना जे यश मिळवले आहे, त्याबद्दल त्याचा सन्मान म्हणून एका स्टँडला विराटचे नाव देण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान कोटला स्टेडीयमला जरी जेटलींचे नाव दिले जाणार असले तरी मैदान फिरोजशहा कोटला नावानेच ओळखले जाणार असल्याचे डीडीसीएने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा यांच्या निधनानंतर दिल्ली क्रिकेट असोशियनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी केली होती.