मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Bjp Mla Gopichand Padalkar) यांनी यवतमाळ व हिंगोली जिल्ह्यातील अप्पर पैनगंगा प्रकल्प ईसापूर धरणास (Isapur Dam) अद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय असे नाव देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) यांच्याकडे केली आहे. याबाबत पडळकरांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात, सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेतलेल्या “आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक यांनी शेतकरी व कष्टकरी रयतेच्या हिताचे राज्य चालवले होते. त्यांनी ८ जानेवारी १८१९ से ३१ जानेवारी १८१९ असा २३ दिवस न्हावा ता. हदगाव, जि.नांदेड येथे स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा दिला होता तसेच ३१ जानेवारी १८१९ नंतर कळमनुरी तालुक्यातील किल्ले वडगाव व उमरखेड पर्यंत संपूर्ण पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव करून सतत स्वातंत्र्याचा लढा लढला. ईसापूर धरण ता. पुसद, जि. यवतमाळ या ठिकाणी त्यांचे काही वर्षे वास्तव्य होते.
अप्पर पैनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचे "आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय" असे नामकरण करणेबाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र…@CMOMaharashtra pic.twitter.com/OzbsS03gzt
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 28, 2022
त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी देशासाठी शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी रयतेसाठी केलेल्या त्याग विचारात घेऊन व त्यांच्या इतिहासाची पुढच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी ईसापुर धरणाचे “आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय” असे नामकरण करण्यात यावे, ही विनंती. असे पत्र गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या
“निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
“भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
अभिनेता अर्जून कपूर नव्हे तर ‘हा’ आहे मलायका अरोराची कमजोरी, फोटोमध्ये सांगितले सिक्रेट
‘सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारला ‘मद्यराष्ट्र’ करू देणार नाही’; भाजप आक्रमक