इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नाही; अयोध्येत राम मंदिर होणारच

श्री श्री रविशंकर यांचा दावा

अहमदनगर: श्री श्री रविशंकर यांनी पुन्हा एकदा अयोध्येत राम मंदिरच होणारच आणि तेही दोन्ही समाजाच्या सहमतीने बनेल, असा दावा असा दावा केला. तसेच इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगरला ते ज्ञानमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त साधकांशी संवाद साधताना बोलत होते.

श्री श्री रविशंकर म्हणाले, “निर्मोही अखाड्याचे ९० वर्षीय वयोवृद्ध रामचंद्र बंगळुरुला भेटले. यावेळी त्यांनी मध्यस्थी करण्याची गळ घालून या जन्मी अयोध्येत राम मंदिर पाहायची इच्छा व्यक्त केली. मात्र या विषयात मोठ्या प्रमाणात राजकारण आहे.”,

तसेच, या प्रकरणी २००२ साली मी दोन्ही समाजाला एकत्र करुन समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अपयश आलं. त्यानंतर शंकराचार्य सरस्वती यांनीही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही अपयश आल्याचं रविशंकर यांनी सांगितलं.

इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नाही. ६० एकरातील एक एकरात मशीद झाल्यास, पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच एकरात वेगळ्या ठिकाणी मशीद बांधावी आणि एक एकर जागा रामजन्मभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव मौलानांनी मानला असल्याचं सांगितलं.