सुधन्वा गोंधळेकरकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त

पुणे : हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणी सुधन्वा गोंधळेकर, आणि शरद कळसकर यांना देखील अटक केळी होती. आतापर्यंत या प्रकरणात 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान घातपाताच्या कटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकर कडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यातआलायं. सुधन्वा कडून १० गावठी पित्सुल, १ गावठी कट्टा, चॉपर, चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. सणासूदीच्या दिवसात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर घातपात घडवण्याच्या बेतात असल्याची माहिती समोर येतीये.

सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा साताऱ्यातील असून तो सातारा शहरातील करंजे परिसरात राहतो. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझाईनचा पुण्यात व्यवसाय असून त्याचे लग्न झालेले आहे. त्याला दोन लहान मुली असून त्याचा लहान भाऊ पुण्यात आयटी क्षेत्रात शिक्षण घेतोय.

पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका 

सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण