पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात

पालघर : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एक सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा सक्रीय कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भिडे गुरुजींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा साताऱ्याचा असून,पुण्यामध्ये त्याचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनीनुसार, घटनास्थळावरून २० बॉम्ब हस्तगत करण्यात आले असून, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये घातपात घडवून आणण्याचा आरोपींचा कट होता.

सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक

राष्ट्रवादीचे आमदार भिडे गुरुजींच्या वेशात ; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनोखे आंदोलन

Loading...

 

3 Comments

Click here to post a comment