पालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट

पालघर :  पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान या स्फोटकं जप्त प्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये मोठा घातपात घडवण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. एटीएसनं अटक केलेला हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्ता वैभव राऊतला त्याच्या दोन साथीदारांसह न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला सादर केली.

आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई एटीएसनं नालासोपाऱ्यातल्या भांडार अळीमधल्या वैभव राऊतच्या घरी छापा मारून स्फोटकं जप्त केली. आणि घातपाताचा मोठा कट उधळलाय. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सरकारनं लावलेले आरोप फेटाळवले आहेत.

भारतीय जवानांकडून १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadgil