राहुल गांधी यांची ती मुलाखत पेड न्यूज ?

टीम महाराष्ट्र देशा – भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर पेड न्यूजचा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पत्रकारांना बोलताना, राहुल गांधींनी पेड न्यूजद्वारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नक्वी यांनी केला आहे. नुकतेच हैदराबादमधील एका स्थानिक वृत्तपत्राला राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीसंदर्भात नक्वी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आलेली राहुल गांधी यांची मुलाखत हे पेड न्यूज एक ज्वलंत उदाहरण असल्याचा ही दावा त्यांनी केला आहे. यांसदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत एक निवेदन देखील दिले आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या मुलाखतीची प्रतिही जोडण्यात आल्या आहे.

Rohan Deshmukh

‘तेलंगणा आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या बरोबर एक दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आणि ही एक पेड न्यूज आहे. हे निवडणूक सुधारणांचे उल्लंघन आहे.’ असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसोबत बैठक केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बातचित करताना नक्वी म्हणाले. आता या प्रकरणावर राहुल गांधी काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

देश टिळा-टोपीच्या राजकारणावर चालत नाही ; नक्वी यांची राहुल गांधींवर आगपाखड

Latur Advt
You might also like
Comments
Loading...