नागराज झळकणार चित्रपटातून; चित्रपटाचे पहिले पोस्टर झाल रिलीज

सैराट या मराठी सिनेमाने १०० कोटीचा गल्ला कमावत मराठी सिनेसृष्टीत एक नवीन इतिहास घडविला आहे.नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. नागराज लवकरच अमिताभ बच्चन सोबत देखील एक चित्रपट करणार आहे. त्या आधी एक महत्त्वाची बातमी नागराज स्वतःहा एका चित्रपटात झळकणार आहे.
फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत आहे., दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘द सायलेन्स’ चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नागराजच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.
या सिनेमात नागराज मंजुळेसोबतच अभिनेत्री अंजली पाटील आणि अभिनेता रघुवीर यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच अंजली पाटीलच्या ‘न्यूटन’ सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाली आहे.सत्य कथेवर आधारित हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा अनिता सिधवानीने लिहिली आहे. खरंतर नागराजने यापूर्वी ‘फँड्री’ तसंच ‘सैराट’मध्ये छोट्या भूमिका साकारल्या होता. परंतु ‘द सायलेन्स’ चित्रपटात तो एक प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे.

You might also like
Comments
Loading...