नागराज मंजुळेंना बिग बी चा ‘बिग’ झटका; चित्रपटातून घेतली माघार !

मुंबई: अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. कोणतेही कारण न देता चित्रटाचे शुटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अमिताभ यांना अन्य निर्मात्यांना तारखा देता येत नव्हत्या. मात्र, आता अधिक काळ इतर निर्मात्यांना तारखा न देणे बच्चन यांना परवडणारे नाही. त्यामुळे अमिताभ यांनी ‘झुंड’ मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

नागराज मंजुळे हे झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. झुंड हा चित्रपट फुटबॉलवर आधारित असून अमिताभ बच्चन प्रशिक्षकाची भूमिका साकारणार होते. मात्र ‘झुंड’चे चित्रीकरण सातत्याने लांबणीवर पडत आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात आनाधीकृत सेट उभारला होता. त्यानंतर मंजुळे यांना सेट हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. चित्रपटाच्या मार्गात कॉपीराईटचेही काही अडथळे आहेत. परिणामी अमिताभ बच्चन यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेऊन निर्मात्यांकडून आतापर्यंत देण्यात आलेले मानधनही परत केल्याचे समजते.

अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे यांच्यात गेल्यावर्षी ‘झुंड’च्या प्रोजेक्टवर काम करण्याविषयी चर्चा झाली होती. हे दोघे एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, नियमबाह्य पद्धतीने चित्रीकरणासाठी सेट उभारणे, कॉपीराईटचेही काही अडथळे नागराजाच्या चांगलच अंगलट आले आहे.

Shivjal