आजच्या काळात रावणाची बाजू देखील समजून घ्यायला हवी : नागराज मंजुळे

nagraj manjule

पुणे : रावण धूसर होत चालला आहे. पण तो कितीही गाडायचा प्रयत्न केला तरीही गाडू शकत नाही. रावण हा बुद्धिमान असून दहा डोक्याने विचार करणारा होता. आज घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, आपल्याला एका बाजूने विचार करण्याची सवय लागली आहे. आपण प्रश्न निर्माण करत नाही. त्यामुळे आजच्या काळात आपण रावणाची बाजू देखील समजून घ्यायला हवी, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे उद्योजक शरद तांदळे लिखित ‘रावण’ राजा राक्षसांचा या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, उद्योजक प्रवीण गायकवाड, चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात, शोभा तांदळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Loading...

नागराज मंजुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांनी त्याकाळी वेगळ्या पद्धतीचे लिखाण केले. आपल्याला देखील अशापद्धतीने वेगळा विचार स्वच्छपणे मांडता आला पाहिजे. खलनायकाला देखील वेगळ्या कोनातून बघण्याची दृष्टी शरद तांदळे यांनी या पुस्तकाने दिली आहे.
प्रवीण गायकवाड म्हणाले, रामराज्याच्या काळात रावण हा विषय घेऊन पुस्तक लिहिण्याचे धाडस करणे ही कौतुकाची गोष्ट आहे. माणूस वाईट नसतो, काळ-वेळ परिस्थिती त्याला घडवत असते. रावण आता खलनायकाचा नायक झाला आहे. राम जन्माला आला तर रावण डोकावणारच आहे. सध्या राममंदिरासाठी मशिद पाडण्याचे वातावरण देशात आहे. अशा वातावरणात शरद तांदळे यांची रावण ही कादंबरी आपल्या समोर आली आहे.

ज्ञानेश महाराव म्हणाले, तुम्ही सत्यनीष्ठ असाल तर असत्य शोधले पाहिजे. सत्य दडवता येते पण संपवता येत नाही. प्रतिक्रिया येतच राहणार परंतु आपण क्रियावादी असले पाहिजे. फसणारे व फसवणारे अशा दोनच जाती आहेत. त्यामुळे आजच्या काळात रावण सांगायला हवा. पुस्तके ही मस्तक तयार करण्यासाठी असतात, असेही त्यांनी सांगितले.

शरद तांदळे म्हणाले, रावणाविषयी वाचन केले आणि त्याविषयी लिहीत गेलो. या पुस्तकासाठी मी ४ वर्षे अभ्यास केला. रावणाला नेहमी खलनायक ठरवले जाते. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि लिहिते व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. अभिनंदन थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभिषेक अवचट यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल कदम यांनी आभार मानले.

‘फर्स्ट क्लास’ भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता : कुमार विश्वास

करमाळा : ‘सैराट’ मुख्याध्यापकानेच मुलीला पळवलं

नागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?