नागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार

ramdas aathavle

टीम महाराष्ट्र देशा; .मराठी चित्रपट सृष्टीत  गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता .प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन चित्रपट आणण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आयुष्याची कहाणी असेल अशी चर्चा आहे

वाईटावर विजय मिळवणारा, दलितांवरील अॅट्रोसिटीविरोधात लढणारा आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणून सर्वांसमोर येणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास ‘पँथर’मध्ये दिसणार आहे. लढा, आंदोलन, जबाबदारी, शांतता यांवर आधारित हा चित्रपटात असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांना मिळालेलं यश या सिनेमातून अधोरेखित होणार आहे ‘हा फक्त माझ्या एकट्याचा आयुष्यपट नाही. दलितांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. पँथर चित्रपटाचा नायक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो. दलितांच्या हक्कांसाठी लढतोय. चित्रपटातून भारतीयांच्या विचारांना दिशा मिळेल’ अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.

नागराज मंजुळे यांच्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यासाठी बोलणी सुरु आहे. राकेश टाक निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. ‘हा फक्त राजकीय-सामाजिक चित्रपट नसेल, तर मनोरंजनात्मक सिनेमा असेल. ‘सैराट’ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बातचित सुरु आहे’ असं टाक यांनी सांगितलं.

Aurangabad Violence- औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली –जयंत पाटील

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !