नागराज मंजुळे आहेत ‘या’ आमदाराच्या कुस्तीचे चाहते

nagraj manjule

टीम महाराष्ट्र देशा:- मी आमदार नारायण पाटील यांच्या कुस्तीचा लहानपासूनचा शौकीन असून मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर नारायण आबांच्या कुस्त्या बघायला जायचो. आमदार नारायण आबा पाटील हे माझ्यासाठी एक हिरो आहेत, असे वक्तव्य दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कर्मयोगी व्याख्यानमालेवेळेस येथे बोलताना केले. भारत महाविद्यालय जेऊर येथे कर्मयोगी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागराज मंजुळे याने महाविद्यालयातील विद्यार्थ्याबरोबर मुक्त संवाद साधला.

यावेळी बोलताना नागराज मंजुळे याने त्याच्या जीवनातील अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला व म्हणाला की, तुम्ही जसे माझे फॅन आहात तसा मी लहानपणी पैलवान आमदार नारायण पाटील यांचा फॅन होतो. मी माझ्या वडिलांबरोबर नारायण आबांच्या कुस्त्या पाहण्यासाठी जायचो. पैलवान आमदार नारायण पाटील हे माझ्यासाठी एक हिरोच आहेत.

Loading...

दरम्यान आमदार नारायण पाटील बोलताना म्हणाले, नागराज हा आमच्या जेऊरचा असल्यामुळे आम्हाला त्याचा आभिमान आहे. त्याने आमच्या जेऊर गावाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध केले आहे. असे म्हणत नागराज याच्यांवर स्तुतिसुमने उधळली. यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, संजय चौधरी, अनंत शिंगाडे, हनुमंत धालगडे, अर्जुन सरक, भूषण मंजुळे, अरबाज शेख, सोमनाथ अवघडे हे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट