नागराज मंजुळेंनी अखेर ‘तो’ सेट हटवला 

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अनधिकृतपणे उभारलेला सेट अखेर हटवण्यात आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल आठ महिन्यानंतर हा सेट हटवण्यात आल्याने मैदान आता पूर्वीप्रमाणे मोकळे झाले आहे. त्यामुळे हे मैदान विद्यार्थी आणि खेळाडूंना पूर्वीप्रमाणे खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर, विद्यापीठ परिसरातील नागरिकांना जॉगिंग आणि व्यायाम करता येणार आहे.

नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता.चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर हा सेट हटवण्यात आला आहे.

video-‘मैदान’ भाड्याने देऊन विद्यापीठाने केली मनमानी

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेणे आवश्यक असते.

मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती.

दरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या

हा सेट काढण्यासाठी जेसीबी लावण्याच्या स्पष्ट सूचना उच्च शिक्षण विभागाने देऊनही मैदानातील सेट काढण्याचे काम अतिशय मंद गतीने सुरू होते. अखेर विद्यापीठाच्या मैदानातील सेट काढण्यात आला असून, मैदान मोकळा श्वास घेत आहे.

अखेर नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्यास सुरवात