नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

nagraj manjule and univercity ground

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading...

pune univarsity

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते. मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते.

( चित्रपटाच्या शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे-थे स्थितीत )

nagraj movie set

दरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी विद्यापीठाला या सूचनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यानंतर कुलगुरू नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे पत्र दिले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विद्यापीठही याबाबतीत उडवा-उडवी करत असल्याचे दिसत आहे.

पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नियमबाह्य पद्धतीने चित्रपटाच्या शुटींग साठी मैदान भाड्याने दिले असल्यामुळे राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. खुद्द राज्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यावर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश देऊन १५ दिवस उलटले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट काढण्यात आला नाही. या संदर्भात कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 

pune univarsityLoading…


Loading…

Loading...